काँग्रेस नेत्यांच्या शिष्ठमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट ; वाचला तक्रारींचा पाढा

काँग्रेस नेत्यांच्या शिष्ठमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट ; वाचला तक्रारींचा पाढा

मुंबई || काँग्रेस नेत्यांच्या शिष्ठमंडळाने शनिवारी(दि.03) रोजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी भेटू घेऊन समस्यांचा पाढा वाचला. काँग्रेसकडीक मंत्र्यांना निधी मिळत नसल्याबद्दल व इतर विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली. यावेळी काँग्रेसच्या वतीने प्रभारी एच. के. पाटील, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हजर होते.

या भेटीनंतर बोलताना काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील म्हणाले, ''काँग्रेसच्या खात्यांना निधी कमी मिळत असल्याबाबत आम्ही मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे.  लवकरच याबाबतील आपण लक्ष घालू असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. किमान समान कार्यक्रमानुसार महाविकास आघाडी स्थापन झाली आहे.या कार्यक्रमाबाबत आम्ही मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली.

सरकारमध्ये समनव्य असावा यासाठी उच्चस्तररीय आढावा घ्यावा अशी सुचना ही आम्ही केली आहे.संजय राऊत यांच्या बाबत काँग्रेस मध्ये नाराजी आहे. याबाबत आम्ही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना बोललो आहे. शिवसेना अद्याप युपीएचा भाग नाही, त्यामुळे राऊत यांनी अध्यक्ष पदाबाबत बोलणे योग्य नाही. असे काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील म्हणाले आहेत.

सरकारच्या प्रतिमे बद्दल बोलाल तर, सरकार आपल्या परीने काम करत आहे. अनेक प्रकरणाची चौकशी सुरू आहे,त्यामुळे लवकरच सत्य समोर येईल असेही एच. के. पाटील माध्यमांशी बोलताना म्हणाले आहेत.

दरम्यान महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, ''किमान समान कार्यक्रमाचा आढावा घेण्याची गरज आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. निधी वाटप आणि महामंडळाच्या नियुक्त्यानाबाबतही चर्चा झाली आहे. सध्या कोरोनाचे संकट पुन्हा ओढावले आहे. या संकटाचा सरकार योग्य पद्धतीने सामना करत आहे. लॉक डाऊन नको हे सर्वांना वाटतं, लाॅक डाऊन ला कोणालाच हौस नाही, पण वाढत्या कोरोना संख्येत लॉक डाऊन नाहीं तर अन्य पर्याय काय यावरही मुख्यमंत्री चर्चा करत आहेत.