गावकारभाऱ्यांनो सहकाऱ्यांना जरा आवरा , हे वागणं बरं नव्हं ! जनतेचा सूर

गावकारभाऱ्यांनो सहकाऱ्यांना जरा आवरा , हे वागणं बरं नव्हं ! जनतेचा सूर

भिगवण || भिगवण करांनी मोठ्या आशेने नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत गाव कारभारी निवडून दिले. निवडून आलेले गाव कारभारी आपल्या गावचा गाडा चांगला हाकतील,गांव गुण्यागोविदानं नांदेल अशीच काही शी अशी अपेक्षा बाळगून होती. मात्र यालाच गावकारभाऱ्यातील काहींनी सुरुंग लावल्याने गावकारभाऱ्यांनो सहकाऱ्यांना जरा आवरा , हे वागणं बरं नव्हं ! म्हनण्याची वेळ भिगवण करांवर आली आहे.

त्याचं घडलीही असं की मागील चार दिवसापूर्वी भिगवण पोलिसांनी अवैद्य जुगार अड्यावर छापा टाकला. यात एक गावकारभारीचं आरोपी निघाला. तर आज महिला सदस्याच्या पतिदेवाने विनयभंगासारखा गुन्हा करावा या सारखे भिगवणकरांचे दुर्दैव ते काय ? एक दोघाच्या कृत्त्याने गावची अब्रू वेशीला टांगली जातेय याचा धडा घेत अन्य गावकारभारी तरी जागे होतील व सर्मसामान्यांना न्याय देतील अशीच अपेक्षा भिगवणकर बाळगून आहेत.

सध्या भिगवण पोलिसांत महिला सदस्याच्या पतिदेवाने  महिलेचा विनयभंग केल्याने पीडित महिलेच्या फिर्यादीवरुन भा.द.वि.का.क .354 ( ड ) , 504 सह अ.जा.अ.ज अत्याचार प्रतिबंधक कायदा सन 1989 चे सुधारीत अधिनियम 2015 चे कलम 3 ( 1 ) ( r ) ( S ) , ( 3 ) ( 2 ) ( V ) ( A ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दत्ता अशोक धवडे , वय 40 वर्षे असे आरोपीचे नांव आहे.

आरोपी दत्ता अशोक धवडे याने दि.14 एप्रिल 2021 ते 14 जून 2021 कालावधीत त्याच्या मोबाईलवरुन फिर्यादी महिलेल्या मोबाईल फोन करुन तिला समक्ष भेटून वहिणी मी तुम्हाला केलेले मेसेज चा किंवा फोनचा राग आला आहे काय? तुम्ही मला लय आवडता ! तुमच्या शिवाय मी नाही राहु शकत,तुम्ही का बोलत नाही. तुम्ही बोलाव म्हणुन मी फोन करतो आहे,तुम्ही नाही बोलला तर मी जीव देईल !  तुम्ही कसे आहात मला तुम्हाला बोलायचे आहे असे म्हणुन फिर्यादीचे मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. तिला जातीवाचक शिवीगाळ केली आहे अशा आशयाच्या फिर्यादोइवरुन भिगवण पोलिसात दि.15 जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील बारामती उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर करित आहेत.