74 व्या स्वातंञदिनानिमित्त कर्मयोगीवर ध्वजारोहन संपन्न ; इथेनॉल उत्पादनावर देणार अधिकचा भर.

74 व्या स्वातंञदिनानिमित्त कर्मयोगीवर ध्वजारोहन संपन्न ; इथेनॉल उत्पादनावर देणार अधिकचा भर. इंदापूर ता.15 : कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर भारत देशाचा 74 वा स्वातंञदिन आज कोरोनाचे पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंसिंगचे पालन करुन महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंञी तथा कारखान्याचे आदरणीय चेअरमन हर्षवर्धनजी पाटील यांचे शुभहस्ते ध्वजारोहन करुन संपन्न झाला.  त्यावेळी कारखान्याचे सर्व संचालक मंडळ उपस्थित होते. ध्वजारोहनानंतर मार्गदर्शन करताना हर्षवर्धनजी पाटील यांनी प्रथम 74 व्या स्वातंञदिनाच्या सर्व उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. आणि कर्मयोगी शंकररावजी पाटील यांचे प्रतिमेला अभिवादन करून उपस्थितांना मार्गदर्शन केले. पुढे बोलताना पाटील यांनी सांगितले की, केंद्रशासनाने बी हेवी मोलॅसेसपासून इथेनॉलनिर्मितीला प्राधान्य दिले असून इथेनॉलचे दर चांगले राहणारे आहेत. साखर उत्पादनापेक्षाही इथेनॉल उत्पादन कारखान्यास फायदेशीर असल्याने सभासदांना ऊसाचा चांगला मोबदला देता येईल. त्यामुळे आपण डिस्टीलरीचे प्रतिदिन इथेनॉल उत्पादन क्षमता वाढवित आहोत. त्यासाठी नविन तीन इथेनॉल साठवणूक टाक्यांची उभारणी सुरू केलेली आहे. त्याचबरोबर 12 हजार मे.टन क्षमतेची मोलॅसेस साठवणूक टाकीचीही उभारणी सुरू करीत आहोत. आम्ही केंद्राकडे इथेनॉल टेंडर 25 वर्षाऐवजी 5 वर्षाचे करणेची मागणी केलेली आहे. लवकरंच याबाबत वरिष्ठ पातळीवर नक्कीच सकारात्मक निर्णय होणार आहे व त्याचा फायदा साखर उद्योगास होणार आहे. यावर्षी तालुक्यामध्ये पर्जन्यमान चांगले आहे. त्यामुळे कार्यक्षेञात ऊसाचे  उत्पादन निश्चितंच वाढणार आहे. त्यामुळे येणा-या गळीत हंगामामध्ये कारखान्याने 14 लाख मे.टन ऊसाचे गाळप, 11.50 टक्के रिकव्हरी, 1 कोटी ब.लि. डिस्टीलरीचे उत्पादन, को-जनचे प्रतिदिन 2 लाख युनिटचे उत्पादन करणेचा आपणा सर्व कामगार, अधिकारी यांचे समन्वयाने करणेचा मानस ठेवलेला आहे. आपले कारखान्यातील कामगारांचे वर्क कल्चर चांगले आहे. ही अभिमानाची गोष्ट आहे. या समन्वयाने जर कारखान्याचे कामकाज चालले तर निश्चितंच यावर्षी कारखान्याची महाराष्टातील पहिल्या काही कारखान्यामध्ये गणना होईल. गाळप हंगामाकरिता कारखान्याने 500 ते 525 टॅक्टर करार करुन ऍ़डव्हान्स वाटप केलेले आहे. व 600 बैलगाडी तसेच 400 टॅक्टरगाडी करार ऍ़डव्हान्ससहीत केलेले आहेत. याप्रसंगी बोलताना ते म्हणाले की आपले कार्यक्षेञातील काही शेतकरी  सेंद्रीय शेती करतात. आपले कारखान्याकडे सेंद्रीय खत प्रकल्प आहे, त्यामधून आपण यावर्षी 40,000 बॅग खताचे उत्पादन करणार आहोत. यामुळे सभासदांनी जर रासायनिक खताऐवजी सेंद्रीय खताचा वापर उसउत्पादनासाठी केला तर जवळजवळ खर्चात बचत होईल. आणि महत्वाचे म्हणजे जमिनीची पोषकताही अबाधित राहील असेही सांगितले. कोरोनाबाबत बोलताना हर्षवर्धन पाटील म्हणाले की जागतिक आरोग्य संघटनेने नुकतेच जाहीर केले आहे की, हा महामारी रोग आणखी वर्षे ते दोन वर्षापर्यंत राहू शकतो. सध्या यावर जागतिक पातळीवर लस संशोधन चालू आहे. काही इन्स्टिटयूट यावर लस शोधून काढण्याचा प्रयत्न करीत आहेत. रशियाने लस शोधली आहे आणि त्याचा परिणाम लवकरंच समजून येईल. परंतु तज्ञांच्या मते हा रोग जरी बरा झाला तरी भविष्यात यापासून बचावासाठी संशोधकांनी प्राणायाम करणे हा एक प्रभावी उपचार असू शकतो असे सांगितले आहे. त्यानुसार रोज 20 ते 25 मिनिटे जर आपण प्राणायाम केला तर या रोगापासून आपण दूर राहू शकतो. याकरिता व्यवस्थापनाने लवकरंच कारखाना कार्यस्थळावर प्राणायामाचे कायमचे शिबीर आयोजित करीत आहोत. त्यामुळे आपले शरिराची इम्युनिटी लेव्हल वाढून निश्चितंच आपण या रोगावर मात करु. कर्मयोगी कारखाना सदैव पर्यावरणाचे संरक्षण करणेसाठी प्राधान्य देतो. त्या अनुषंगाने नुकतेच कारखाना परिसरामध्ये विशाखापट्टणम येथून 6500 दिर्घायुषी झाडांची रोपे आणून त्याची लागवड केलेली आहे. मी आज सर्व कर्मचा-यांना आवाहन करतो की या सर्व झाडांची निगा राखणेची आपणा सर्वांची जबाबदारी आहे. यावर्षी साखर कारखाना, आसवणी प्रकल्प पूर्ण क्षमतेने  चालणार आहे. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखणेसाठी या व्रुक्षलागवडीचा निश्चितंच फायदा होणार आहे. असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कारखान्याचे कार्यकारी संचालक बाजीराव सुतार यांनी केले. या कार्यक्रमास कारखान्याचे संचालक राजेंद्र गायकवाड, भास्कर गुरगुडे, श्री. सुभाष काळे,मच्छिंद्र अभंग,वसंत मोहोळकर,पांडुरंग गलांडे, सर्व अधिकारी, कर्मचारी यांचे उपस्थितीत होते. सोशल डिस्टंसिंगचे काटेकोरपणे पालन करून हा कार्यक्रम संपन्न झाला.

74 व्या स्वातंञदिनानिमित्त कर्मयोगीवर ध्वजारोहन संपन्न ; इथेनॉल उत्पादनावर देणार अधिकचा भर.

74 व्या स्वातंञदिनानिमित्त कर्मयोगीवर ध्वजारोहन संपन्न ; इथेनॉल उत्पादनावर देणार अधिकचा भर.

इंदापूर ता.15 : कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर भारत देशाचा 74 वा स्वातंञदिन आज कोरोनाचे पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंसिंगचे पालन करुन महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंञी तथा कारखान्याचे आदरणीय चेअरमन हर्षवर्धनजी पाटील यांचे शुभहस्ते ध्वजारोहन करुन संपन्न झाला.  त्यावेळी कारखान्याचे सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.

ध्वजारोहनानंतर मार्गदर्शन करताना हर्षवर्धनजी पाटील यांनी प्रथम 74 व्या स्वातंञदिनाच्या सर्व उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. आणि कर्मयोगी शंकररावजी पाटील यांचे प्रतिमेला अभिवादन करून उपस्थितांना मार्गदर्शन केले.

पुढे बोलताना पाटील यांनी सांगितले की, केंद्रशासनाने बी हेवी मोलॅसेसपासून इथेनॉलनिर्मितीला प्राधान्य दिले असून इथेनॉलचे दर चांगले राहणारे आहेत. साखर उत्पादनापेक्षाही इथेनॉल उत्पादन कारखान्यास फायदेशीर असल्याने सभासदांना ऊसाचा चांगला मोबदला देता येईल. त्यामुळे आपण डिस्टीलरीचे प्रतिदिन इथेनॉल उत्पादन क्षमता वाढवित आहोत. त्यासाठी नविन तीन इथेनॉल साठवणूक टाक्यांची उभारणी सुरू केलेली आहे. त्याचबरोबर 12 हजार मे.टन क्षमतेची मोलॅसेस साठवणूक टाकीचीही उभारणी सुरू करीत आहोत. आम्ही केंद्राकडे इथेनॉल टेंडर 25 वर्षाऐवजी 5 वर्षाचे करणेची मागणी केलेली आहे. लवकरंच याबाबत वरिष्ठ पातळीवर नक्कीच सकारात्मक निर्णय होणार आहे व त्याचा फायदा साखर उद्योगास होणार आहे.

यावर्षी तालुक्यामध्ये पर्जन्यमान चांगले आहे. त्यामुळे कार्यक्षेञात ऊसाचे  उत्पादन निश्चितंच वाढणार आहे. त्यामुळे येणा-या गळीत हंगामामध्ये कारखान्याने 14 लाख मे.टन ऊसाचे गाळप, 11.50 टक्के रिकव्हरी, 1 कोटी ब.लि. डिस्टीलरीचे उत्पादन, को-जनचे प्रतिदिन 2 लाख युनिटचे उत्पादन करणेचा आपणा सर्व कामगार, अधिकारी यांचे समन्वयाने करणेचा मानस ठेवलेला आहे. आपले कारखान्यातील कामगारांचे वर्क कल्चर चांगले आहे. ही अभिमानाची गोष्ट आहे. या समन्वयाने जर कारखान्याचे कामकाज चालले तर निश्चितंच यावर्षी कारखान्याची महाराष्टातील पहिल्या काही कारखान्यामध्ये गणना होईल. गाळप हंगामाकरिता कारखान्याने 500 ते 525 टॅक्टर करार करुन ऍ़डव्हान्स वाटप केलेले आहे. व 600 बैलगाडी तसेच 400 टॅक्टरगाडी करार ऍ़डव्हान्ससहीत केलेले आहेत.

याप्रसंगी बोलताना ते म्हणाले की आपले कार्यक्षेञातील काही शेतकरी  सेंद्रीय शेती करतात. आपले कारखान्याकडे सेंद्रीय खत प्रकल्प आहे, त्यामधून आपण यावर्षी 40,000 बॅग खताचे उत्पादन करणार आहोत. यामुळे सभासदांनी जर रासायनिक खताऐवजी सेंद्रीय खताचा वापर उसउत्पादनासाठी केला तर जवळजवळ खर्चात बचत होईल. आणि महत्वाचे म्हणजे जमिनीची पोषकताही अबाधित राहील असेही सांगितले.

कोरोनाबाबत बोलताना हर्षवर्धन पाटील म्हणाले की जागतिक आरोग्य संघटनेने नुकतेच जाहीर केले आहे की, हा महामारी रोग आणखी वर्षे ते दोन वर्षापर्यंत राहू शकतो. सध्या यावर जागतिक पातळीवर लस संशोधन चालू आहे. काही इन्स्टिटयूट यावर लस शोधून काढण्याचा प्रयत्न करीत आहेत. रशियाने लस शोधली आहे आणि त्याचा परिणाम लवकरंच समजून येईल. परंतु तज्ञांच्या मते हा रोग जरी बरा झाला तरी भविष्यात यापासून बचावासाठी संशोधकांनी प्राणायाम करणे हा एक प्रभावी उपचार असू शकतो असे सांगितले आहे. त्यानुसार रोज 20 ते 25 मिनिटे जर आपण प्राणायाम केला तर या रोगापासून आपण दूर राहू शकतो. याकरिता व्यवस्थापनाने लवकरंच कारखाना कार्यस्थळावर प्राणायामाचे कायमचे शिबीर आयोजित करीत आहोत. त्यामुळे आपले शरिराची इम्युनिटी लेव्हल वाढून निश्चितंच आपण या रोगावर मात करु.

कर्मयोगी कारखाना सदैव पर्यावरणाचे संरक्षण करणेसाठी प्राधान्य देतो. त्या अनुषंगाने नुकतेच कारखाना परिसरामध्ये विशाखापट्टणम येथून 6500 दिर्घायुषी झाडांची रोपे आणून त्याची लागवड केलेली आहे. मी आज सर्व कर्मचा-यांना आवाहन करतो की या सर्व झाडांची निगा राखणेची आपणा सर्वांची जबाबदारी आहे. यावर्षी साखर कारखाना, आसवणी प्रकल्प पूर्ण क्षमतेने  चालणार आहे. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखणेसाठी या व्रुक्षलागवडीचा निश्चितंच फायदा होणार आहे. असेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कारखान्याचे कार्यकारी संचालक बाजीराव सुतार यांनी केले. या कार्यक्रमास कारखान्याचे संचालक राजेंद्र गायकवाड, भास्कर गुरगुडे, श्री. सुभाष काळे,मच्छिंद्र अभंग,वसंत मोहोळकर,पांडुरंग गलांडे, सर्व अधिकारी, कर्मचारी यांचे उपस्थितीत होते. सोशल डिस्टंसिंगचे काटेकोरपणे पालन करून हा कार्यक्रम संपन्न झाला.