कर्मयोगीच्या 21 जागांसाठी 46 अर्ज दाखल ; सहा जागा बिनविरोध - औपचारिकता बाकी 

कर्मयोगीच्या 21 जागांसाठी 46 अर्ज दाखल ; सहा जागा बिनविरोध - औपचारिकता बाकी 

इंदापूर || कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदाच्या पंचवार्षिक निवडणूक प्रक्रियेत शुक्रवार दि.24 सप्टेंबर रोजी नामनिर्देशनाच्या शेवटच्या दिवशी एकुण 21 जागंसाठी 46 उमदवारी अर्ज दाखल झाले. यापैकी सहा जागा बिनविरोध झाला आहेत. मात्र औपचारिकता बाकी आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने आपली भुमिका स्पष्ट केल्यानंतर कर्मयोगी ची निवडणूक लागणार कि बिनविरोध होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र हे चित्र 12 आँक्टोबर रोजी स्पष्ट होणार आहे.

ऊस उत्पादक सभासद मतदार संघ इंदापूर गट नं.१ मधून अनुक्रमे मदन श्रीरंग व्यवहारे - माळवाडी नं.1, दिनकर पांडुरंग गायकवाड - भांडगांव,शांतिलाल दत्तात्रय शिंदे अवसरी,रवींद्र वामनराव सरडे - सरडेवाडी,बाळासाहेब तुकाराम मोरे - माळवाडी नं.2, अमोल गुलाब इंगळे - बाभुळगांव,दत्तात्रय गणपत कोळेकर - सरडेवाडी,शिवाजी सतू इजगुडे - शहा आणि भरत सुरेशदास शहा - इंदापूर अशा एकूण 9 सभासदांनी नामनिर्देशन अर्ज दाखल केला आहे.

ऊस उत्पादक सभासद मतदार संघ गट नं.२ -कालठण  मधून अनुक्रमे हर्षवर्धन शहाजीराव पाटील - इंदापूर (दोन अर्ज), गुलाब मारुती फलफले - गलांडवाडी नं.1, विष्णू दिगंबर देवकर - कळाशी,राघव किसन व्यवहारे - शिरसोडी,छगण धोंडिबा भोंगळे - पोंदलुकवाडी,सुभाष लक्ष्मण बोंगाणे - पडस्थळ,हनुमंत अंकुश जाधव - कालठण नं.१, सतिश विठ्ठल जगताप - कालठण नं.१ असे एकूण 9 अर्ज दाखल करण्यात आले आहेत. 

ऊस उत्पादक सभासद मतदार संघ गट नं.3 - पळसदेव मधून अनुक्रमे रतन हरिश्चंद्र देवकर - लोणी देवकर,प्रवीण यादवराव देवकर - वरकुटे बुद्रुक, भूषण प्रकाश काळे - पळसदेव असे एकूण 3 अर्ज दाखल झाल्याने हा गट बिनविरोध झाला आहे.मात्र औपचारिक घोषणा बाकी आहे.

ऊस उत्पादक सभासद मतदार संघ गट नं.4 - भिगवण मधून अनुक्रमे परागकण रमेशराव जाधव (दोन उमेदवारी अर्ज) - भिगवण , यशवंत मुकुंदराव वाघ (दोन अर्ज) - तक्रारवाडी , जगन्नाथ लाला जगताप - तक्रारवाडी, विश्वास रंगनाथ देवकाते - मदनवाडी, निवृत्ती भिकू गायकवाड - कळस, विजय विठ्ठल खर्चे - कळस, सतिश उत्तमराव काळे - डिकसळ, वसंत खंडू मोहळकर - कळस असे एकूण 10 अर्ज दाखल झाले आहेत.

ऊस उत्पादक सभासद मतदार संघ गट नं.5  - शेळगांव  मधून अनुक्रमे राहुल विठ्ठल जाधव - शेळगांव, प्रतिक विश्वासराव पाटील - कळंब, अंबादास विठ्ठल शिंगाडे - शेळगांव ,शिवाजी दामू शिंगाडे - शेळगांव, सर्जेराव गजरु शिंगाडे - शेळगांव असे एकूण 5 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

अनुसूचीत जाती जमाती प्रतिनिधी मधून बलभीम बापू आढाव - तक्रारवाडी, केशव विनायक दुर्गे - अगोती नं.१ असे एकुण 2 अर्ज दाखल झाले आहेत.

इतर मागासवर्गीय प्रतिनिधी मधून सतिश उध्दव व्यवहारे - माळवाडी नं.१ यांचा एकमेव अर्ज आहे.त्यामुळे ही जागा बिनविरोध झाली असून औपचारिक घोषणा बाकी आहे. 

भटक्या विमुक्त जाती व जमाती विशेष मागास प्रवर्ग वर्गातील प्रतिनिधी मधून हिरा शंकर पारेकर - वनगळी, शिवाजी सतू इजगुडे - शहा असे एकूण 2 अर्ज दाखल झाले आहेत.

महिला राखीव प्रतिनिधी मधून शारदा कुबेर पवार - पिंपरी, कांचन अशोक कदम - गोतोंडी असे एकूण 2 अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे या जागा बिनविरोध झाल्या असून औपचारिक घोषणा बाकी आहे. 

"ब" वर्ग सभासद प्रतिनिधी मधून हर्षवर्धन शहाजीराव पाटील (दोन अर्ज) - इंदापूर, वसंत खंडु मोहळकर - कळस असे एकूण 3 अर्ज दाखल झाले आहेत.