294 नागरिकांची कोरोनावर यशस्वी मात ; मात्र 10 व्यक्तींचा मृत्यू

294 नागरिकांची कोरोनावर यशस्वी मात ; मात्र 10 व्यक्तींचा मृत्यू

इंदापूर || तालुक्यात कोरोनाचे सावट गडद होत असताना नागरिकांसाठी सकारात्मक बातमी आहे. कोरोनाची चाचणी बाधित आल्यानंतर उपचार घेत असलेल्या 294 नागरिकांनी कोरोनावर यशस्वी मात केल्यामुळे सोमवारी दि.03 रोजी त्यांना घरी सोडण्यात आले. यात ग्रामीण भागातील 248 व शहरातील 46 व्यक्तींचा समावेश आहे.दरम्यान कोरोनामुळे दहा व्यक्तींचा मृत्यू देखील झाला आहे. त्यामुळे नागरिकांना आजार अंगावर न काढता काही लक्षणे जाणवत असल्यास तात्काळ आरोग्य विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन तहसीलदार अनिल ठोंबरे यांनी केले आहे.

इंदापूर तालुक्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचा फास आवळला गेला असून तो सध्या तरी ढिला होताना दिसत नाही. सोमवारी दि.03 रोजी तपासणी करण्यात आलेल्यांपैकी 208 नागरिकांचा चाचणी अहवाल पाॅझिटीव्ह आला आहे. यात ग्रामीण भागातील 179 तर शहरातील 29 रुग्णांचा समावेश आहे. सध्या कोरोनावर उपचार घेत असणाऱ्या नागरिकांची संख्या 2626 इतकी असून आजपर्यंत कोरोनामुळे 245 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.

ज्या पटीत कोरोनाची रुग्ण कोरोनावर मात करित आहेत. त्याच पटीत नव्या रुग्णांची भर पडत असल्याने आरोग्य यंत्रणेवरचा ताण कुठेही कमी होताना दिसत नाही. बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी यंत्रणेचे धावाधाव होत असून यंत्रणेला सर्हकार्य करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. सध्य स्थिती पाहता कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी स्वतःहुन पुढाकार घेऊन निर्बंध अधिक कटाक्षाने पाळण्याची गरज आहे.