इंदापूर तालुक्यात आज कोरोनाचे 167 नवे रुग्ण ; बावडा गावात आढळले 30 रुग्ण

इंदापूर तालुक्यात आज कोरोनाचे 167 नवे रुग्ण ; बावडा गावात आढळले 30 रुग्ण

इंदापूर || वाढत्या कोरोना रुग्ण संख्येला आळा घालण्यासाठी राज्यात काही निर्बंध लावण्यात आले आहेत. तर वीकेंड लाॅक डाऊन ही पाळण्यात येतोय. मात्र कोरोनाची साखळी तुटता तुटत नाही. इंदापूर तालुक्यात आज रविवारी करण्यात आलेल्या चाचण्यात तब्बल 167 व्यक्तींचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटीव्ह आला आहे.तर एकट्या बावडा या गावात शंभर व्यक्तींची चाचणी करण्यात आली यात 30 व्यक्ती पाॅझिटीव्ह आल्याने आता इंदापूर तालुका कोरोनाचा हाँटस्पाॅट बनल्याचे चित्र पहायला मिळतेय. 

वाढत्या कोरोना संख्येला रोखण्यासाठी प्रशासन सपशेल अपयशी ठरले आहे.इंदापूर तालुक्याच्या ग्रामीण भागात गावागावातून कोरोनाचे रुग्ण सापडू लागल्याने आरोग्याच्या सुविधाही अपुऱ्या पडू लागल्या आहेत. इंदापूर तालुक्यात शुक्रवारी दि.17 रोजी एका दिवसात कोरोनाचा विस्फोट पहायला मिळाला.एकाच दिवशी 213 व्यक्तींचा चाचणी अहवाल पाॅझिटीव्ह आल्याने यंत्रणेलाही घाम फुटला.तर शनिवारी 190 व्यक्ती पाॅझिटीव्ह आल्या. यांच्यावर उपचार करतो ना तोच आज रविवारी दि.18 एप्रिल रोजी नव्याने 167 व्यक्तींचा अहवाल पाॅझिटीव्ह आल्याने त्यात अधिकची भर पडली.तालुक्यातील आत्तापर्यंत 8376 रुग्ण कोरोना बाधित झाले असून 6756 रुग्ण उपचार घेऊन बरे झालेले घरी सोडण्यात आले आहेत. तर 179 रुग्ण मयत झाले आहेत.

शहरातील उपजिल्हा रूग्णालयात कोरोना रुग्णांवर केले जातात. मात्र तालुक्यात रुग्ण संख्या वाढल्याने याठिकाणी उपचारासाठी रांगा लागत आहेत. सध्याची इंदापूर तालुक्याची परिस्थिती ही पूर्णपणे हाताबाहेर गेल्याचे चित्र आजच्या घडीला दिसत असून वाढत्या रुग्णसंख्येला थोपवण्यासाठी व बाधितांवर उपचार करण्यासाठी यंत्रणा कुजकामी ठरत आहे. तालुक्याची गंभीर स्थिती पाहून आतातरी प्रशासनाने ठोस पावले उचलून कोरोना संक्रमण आटोक्यात आनावे,शिवाय रूग्णांवर वेळेत उपचार होण्यासाठी ठोस उपाययोजना राबवण्याची गरज आहे.

इंदापुरात उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू…

इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात एकूण  89 रुग्ण उपचारासाठी दाखल आहेत तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतीगृहात १५७ रुग्ण आहेत.शहरातील इंदापूर महाविद्यालयात ५० बेडची यंत्रणा तैनात केली असून त्याठिकाणीही रुग्ण दाखल करणार आहोत . मात्र  दररोज शेकडो रुग्णांची भर पडत असल्याने शर्तीचे प्रयत्न करत आहोत.शासकीय रुग्णालयात रेमडीसिव्हीर  इंजेक्शन सध्या तरी कमतरता नाही. जेवढे रुग्ण दाखल आहेत त्यांना इंजेक्शन मिळत आहे.त्यासाठी दररोज पुण्याला गाडी पाठवत आहोत.असे इंदापूर उपजिल्हा रुग्णालयाचे वरिष्ठ वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर एकनाथ चंदनशिवे यांनी सांगितले.