इंदापूरकरांच्या सेवेतील गोरे हॉस्पिटलची 11 वर्षे पूर्ण ; उत्तम सेवा देण्यास आम्ही वचनबध्द - डाॅ.पंकज गोरे 

इंदापूरकरांच्या सेवेतील गोरे हॉस्पिटलची 11 वर्षे पूर्ण ; उत्तम सेवा देण्यास आम्ही वचनबध्द - डाॅ.पंकज गोरे 

इंदापूर 20 // अल्पावधित बालरुग्णालय म्हणून वेगळी ओळख निर्माण झालेल्या इंदापूर शहरातील गोरे हाॅस्पिटल ला आज इंदापूर करांच्या सेवेत दाखल होऊन बरोबर अकरा वर्ष पूर्ण झाली. बैंगलोर शहरातील राजीव गांधी युनिव्हर्सिटी या ठिकाणी उच्चशिक्षण घेऊन डाॅक्टर क्षेत्रातील एम.डी.बालरोग तज्ञ ही पदवी प्राप्त करुन डाॅ.पंकज गोरे 19 फेब्रुवारी 2010 रोजी खाजगी रूग्णालयाच्या माध्यमातून इंदापूरकरांच्या सेवेत दाखल झाले. तालुक्यातील रूग्णांना उच्च प्रतीची सेवा देवून एका डाॅक्टरची समाजाप्रती असलेली कर्तव्य त्यांनी या कालखंडात अचूक पार पाडली.सुसज्ज व्यवस्था,अध्यावत तंत्रज्ञान,शिक्षित स्टाफ व तत्पर सेवा यामुळे अल्प कालावधीत डाॅ.गोरे हाॅस्पिटल तालुक्यात लोकप्रिय झाले.

या कालखंडात अनेक चढ उतार पहायला मिळाले.मात्र रुग्णांप्रती बजावलेली सेवा आणि संपादित केलेला रुग्णांचा विश्वास यामुळे कालठण रोड ला एका लहानशा जागेत चालू केलेले रूग्णालयात आज भल्या मोठ्या इमारतीत रूपांतरित झाले. स्वमालकीच्या जागेत लाखो रुपये दवाखाना निर्मितीत खर्च करुन समोर कर्जाचा डोंगर उभा असताना कोरोना महामारिचे नवे संकट सर्वांसमोर उभे ठाकले.या जागतिक महामारिने  सर्वांचीच अग्निपरिक्षा पाहिली. या  महामारित सर्वसामान्य जनतेचे हाल पाहून डाॅ.पंकज गोरे यांनी एक महत्वपूर्ण निर्यण घेतला,त्याचे तालुक्यातून सर्व स्तरातून कौतुक झाले.त्यांनी गोरे हाॅस्पिटल मध्ये "निरोगी बालपण" हा आदर्श उपक्रम राबवला. तीन महिने चालणाऱ्या या उपक्रमात गोरे हाॅस्पिटल ने अठरा वर्षा खालील सर्व मुलांची मोफत तपासणी मोहिम राबवत समाजाशी असणारी नाळ आणखी घट्ट केली. त्यांच्या या कार्याची दखल आजी माजी लोकप्रतिनिधींनी घेत गोरे हाॅस्पिटल ला भेट देऊन डाॅ.पंकज गोरे व डाॅ.वैशाली गोरे यांसह गोरे कुटुंबाचे कौतुक केले. 

आज गोरे हाॅस्पिटलचा खाजगी आरोग्य क्षेत्रात सेवा बजावत असताना अकरा वर्षाचा टप्पा पार पडला आहे.यानिमित्ताने अनेकांनी डाॅ.गोरे हाँस्पिटल व डाॅ.पंकज गोरे यांवर शुभेच्छांचा वर्षा केला. या शुभेच्छा रुपी आशिर्वादाला प्रतिसाद देताना डाॅ.पंकज गोरे म्हणाले,की आजपर्यंत रुग्णसेवेला आम्ही प्रथम स्थान देत आलो आहोत. रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा या प्रमाणे आम्ही आमची कर्तव्य पार पाडली आहेत.भविष्यात ही गोरे हॉस्पिटल उत्तम सेवा देण्यास कटिबद्ध असेल.