मामाने पेटारा उघडला 25/15 अंतर्गत इंदापूर तालुक्याला 10 कोटी 5 लक्ष निधी मंजूर ; वाचा कोणत्या गावाला किती निधी

मामाने पेटारा उघडला 25/15 अंतर्गत इंदापूर तालुक्याला 10 कोटी 5 लक्ष निधी मंजूर ; वाचा कोणत्या गावाला किती निधी

इंदापूर || राज्य शासनाच्या 25/15 अंतर्गत इंदापूर तालुक्यातील विकास कामांकरीता 10 कोटी 05 लक्ष निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती इंदापूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रसिद्धी पत्रकाव्दारे दिली आहे.

प्रत्येक गावामध्ये वाडी वस्तीवर सर्वसामान्य मानसाला कशा पध्दतीने विकास कामांचा फायदा होईल याची आखणी करुन राज्यमंत्री भरणे यांनी ही कामे मंजूर केलेली आहेत. यामुळे रस्ते पक्के होऊन जोडले जाणार आहेत. त्यामुळे दळणवळणाची क्रिया जलद होईल. तसेच अनेक गावात हायमास्ट दिवे बसविण्यात येणार आहेत. 25/15 सारख्या फंडातून पहिल्यांदा एवढा मोठा निधी प्राप्त झालेला आहे. त्यामुळे तालुक्यातील विविध गावांना याचा फायदा होणार आहे असं राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे व कार्याध्यक्ष अतुल झगडे यांनी म्हटले आहे.

कोणत्या गावाला किती निधी…

 • तरंगवाडी - व्यायमशाळा बांधकाम करणे 10 लक्ष.
 • शेटफळगढे - निंबोडी रस्ता ते पडळकर वस्ती रस्ता करणे 25 लाख.
 • भांडगांव - कदम वस्ती ते जगताप वस्ती मुरमीकरण 5 लक्ष.
 • तरंगवाडी आण्णा दत्तु तरंगे वस्ती हायमास्ट दिवा 3 लक्ष.
 • तरंगवाडी नवीन व्यायामशाळा बांधकाम गावठाण मध्ये 5 लक्ष.
 • लोणी देवकर डाक बंगला ते कोकण मार्ग रस्ता 25 लक्ष.
 • आजोती सुगांव समाजमंदीर बांधकाम 5 लक्ष.
 • थोरातवाडी हायमास्ट दिवा बसवणे 3 लक्ष.
 • वडापूरी तुळजाभवाणी मंदीर सभामंडप 5 लक्ष.
 • निमगांव केतकी श्रीकृष्ण नगर सामाजिक सभागृह बांधकाम 10 लक्ष.
 • निमसाखर मोरे वस्ती ते कारंडेवस्ती डांबरीकरण 20 लक्ष.
 • वडापुरी येथे बौद्ध विहार बांधकाम करणे 20 लक्ष रुपये.
 • कचरवाडी व्याहळी रस्ता मिसाळ वस्ती ते चोरंबे वस्ती रस्ता 15 लक्ष रूपये.
 • बेलवाडी जामदार मळा हायमास्ट दिवा 3 लक्ष रुपये.
 • सराटी येथे भैया कोकाटे वस्ती रस्ता 20 लक्ष रुपये.
 • सराटी येथे भैया कोकाटे वस्ती हायमास्ट दिवा 3 लक्ष.
 • चाकाटी हायमास्ट दिवा 3 लक्ष.
 • बावडा शिंदे वस्ती हायमास्ट दिवा 3 लक्ष.
 • बाभुळगाव येथे सुभाष डरंगे ते टिपले वस्ती रस्ता 3 लक्ष रुपये.
 • कुरवली येथे योगेश माने वस्ती हाय मास्ट दिवा बसवणे 3 लक्ष.
 • वडापुरी हनुमान वाडी रस्ता करणे 20 लक्ष रुपये.
 • लाकडी येथे बगले वस्ती ते खाडे वस्ती रस्ता करणे 20 लक्ष रुपये.
 • लाकडी येथे मुस्लीम मज्जीद संरक्षण भिंत 20 लक्ष रुपये.
 • बेलवाडी येथे पवार मळा रोहन थोरात वस्ती हाय मास्ट दिवा बसवणे 3 लक्ष रुपये.
 • निंबोडी येथे शरद चंद्रजी पवार साहेब  बहुउद्देशीय.
 • सामाजिक सभागृह बांधने 25 लक्ष रुपये.
 • आनंदनगर येथे करे सर व राखुंडे सर याठिकाणी हायमास्ट दिवा बसवणे 3 लक्ष.
 • पळसदेव शेलार पट्टा हनुमान मंदिर सभामंडप 5 लक्ष रुपये.
 • डिकसळ रेल्वे गेट नंबर 22 ते हगारे वस्ती.
 • पोंदकुले वस्ती रस्ता काँक्रेटीकरण 20 लक्ष.
 • कळंब येथील विश्वासराव रणसिंग महाविद्यालय येथे वाचनालय बांधकाम 20 लक्ष.
 • शिरसोडी खामगळ वस्ती येथे पिरसाहेब सभामंडप 7 लक्ष.
 • शिरसोडी खामगळ वस्ती जिल्हा परिषद शाळा पेव्हींग ब्लॉक टाकणे 3 लक्ष.
 • गोंदी ओझरे येथे खटकेवस्ती येथे व्यायामशाळा बांधकाम करणे 8 लक्ष.
 • काटी येथे बसस्थानक ते यशवंत मेडिकल काँक्रिटीकरण रस्ता करणे 10 लक्ष.
 • काटी येथे पिटकेश्वर रस्ता ते अवताडे वस्ती रस्ता कॉंक्रिटीकरण करणे 10 लक्ष.
 • रेडा येथे गुलाब बाबा ध्यानमंदिर सामाजिक सभागृह बांधकाम 5 लक्ष रुपये.
 • काटी येते महादेव मार्ग ते सोलनकर दरेकर वस्ती रस्ता करणे 10 लक्ष.
 • काटी येथे भोंग वस्ती ते बरकडे वस्ती रस्ता कॉंक्रिटीकरण करणे 10 लक्ष.
 • गोखळी येथे पारेकर वस्ती बारामती रोड ते आंब्याचा मळा रस्ता कॉंक्रिटीकरण करणे 10 लक्ष.
 • निमसाखर येथील निमजाई झोपडपट्टी याठिकाणी हायमास्ट दिवा बसवणे 3 लक्ष.
 • रणगांव येथे शिवाजी रकटे ते किसन जाधव रस्ता 20 लक्ष.
 • दगडवाडी ते निरवांगी रस्ता 20 लक्ष.
 • तरंगवाडी गावडे वस्ती सामाजिक सभागृह बांधकाम 5 लक्ष.
 • निरनिमगाव इंदिरा नगर येथे सामाजिक सभागृह 5 लक्ष.
 • कुरवली इंदिरानगर येथे बंदिस्त गटार योजना 10 लक्ष.
 • सुरवड येथील लक्ष्मी माता नगर येथे सामाजिक सभागृह बांधकाम 5 लक्ष.
 • गोतंडी येथे पिरसाहेब दर्गा मज्जीद चौक येथे सामाजिक सभाग्रह बांधकाम 5 लक्ष.
 • कुरवली कदम वस्ती व्यायामशाळा बांधकाम 5 लक्ष.
 • वडापुरी बुद्धविहार लगत सामाजिक सभागृह बांधकाम 10 लक्ष,
 • भरणेवाडी बिरोबा मंदिर परिसरात सामाजिक सभागृह बांधकाम 35 लक्ष.
 • अंथुर्णे येथील मुस्लिम समाज दर्गा रस्त्यालगत पेव्हर ब्लॉक बसवणे 5 लक्ष.
 • अंथुर्णे येतील अण्णाभाऊ साठे समाज मंदिर रस्त्यालगत पेव्हिंग ब्लॉक बसवणे 3 लक्ष.
 • तरंगवाडी सरस्वती नगर येथे सामाजिक सभागृह बांधकाम 10 लक्ष.
 • बाभूळगाव डरंगे वस्ती सामाजिक सभागृह बांधणे 5 लक्ष.
 • झगडेवाडी येथे सामाजिक सभागृह बांधणे 5 लक्ष.
 • बोरी येथील बाजारतळ पटांगण पेव्हिंग ब्लॉक बसवणे 25 लक्ष.
 • गोतोंडी विठ्ठल नगर येथे सामाजिक सभागृह बांधकाम 5 लक्ष.
 • जंक्शन येथे रस्ता कॉंक्रिटीकरण करणे 15 लक्ष.
 • गोतोंडी येथे व्यायाम शाळा इमारत बांधकाम 5 लक्ष.
 • बोरी नागवे खंडोबा मंदिर परिसरात सामाजिक सभागृह बांधकाम 15 लक्ष.
 • बेलवाडी येथे मारुती मंदिर परिसरात सामाजिक सभागृह बांधणे 15 लक्ष.
 • बेलवाडी येथे ज्योतीबा मंदिर परिसरात सामाजिक सभागृह बांधणे 10 लक्ष.
 • भरणेवाडी येथे दर्गा मज्जित परिसरात सामाजिक सभागृह बांधकाम 10 लक्ष.
 • अंथुर्णे येथील महादेव मंदिर परिसरात मल्टीपर्पज हॉल बांधकाम करणे 70 लक्ष.
 • भरणेवाडी येथील बिरोबा मंदिर रस्ता 25 लक्ष, पिंपरी बुद्रुक येथील पडळकर वस्ती रस्ता 30 लक्ष रुपये.
 • हिंगणगांव येथे पुणे सोलापूर हायवे मारुती कोळेकर वस्ती रस्ता पुलाचे बांधकाम 25 लक्ष.
 • निमगाव केतकी ते महादेव मंदिर - बारवकर वस्ती माने वस्ती रस्ता करणे 25 लक्ष.
 • निमगाव केतकी खोरी वस्ती रस्ता तयार करणे 25 लक्ष.
 • घोलपवाडी नंदीवाले समाज वस्ती कॉंक्रिटीकरण रस्ता 5 लक्ष.
 • सराफवाडी सूर्यवंशी वस्ती येथील पिटकेश्वर ओढा रस्ता करणे 5 लक्ष.
 • सराफवाडी अमराई येथील धनाजी जाधव घर ते निर्वांगी रोड कॅनल पट्टी दुरुस्ती 5 लक्ष.
 • सराफवाडी येथील विठ्ठल शिंदे घर ते सचिन सूर्यवंशी रस्ता तयार करणे 5 लक्ष.
 • पिटकेश्वर येथे महादेव मंदिर परिसरात सामाजिक सभागृह बांधकाम 5 लक्ष.
 • चाकाटी येथे नांगरे गर्जे वस्ती येथे सामाजिक सभागृह बांधकाम 5 लक्ष.
 • गिरवी येथे सामाजिक सभागृह बांधणे 5 लक्ष.
  गोंदी येथे खंडोबा मंदिर परिसरात सामाजिक सभागृह बांधणे 5 लक्ष.
 • कळंब वाचलंदनगर लोहार वस्ती रस्ता करणे 15 लक्ष.
 • डाळज येथील पुरातत्त्व महादेव मंदिर परिसरात सामाजिक सभागृह बांधणे 5 लक्ष.
 • पिठेवाडी येथील लक्ष्मी मंदिर परिसरात सामाजिक सभागृह बांधणी 5 लक्ष.
 • निरनिमगाव येथील संत बाळूमामा मंदिर परिसरात सामाजिक सभागृह बांधणे 5 लक्ष.
 • नाव्ही रासकर वस्ती येथे तुळजाभवानी मंदिर परिसरात सामाजिक सभागृह बांधकाम 6 लक्ष.
 • सुरवड येथील वडार समाजाच्या लक्ष्मीमाता मंदिर परिसरात सामाजिक सभागृह बांधकाम 6 लक्ष.
 • निंबोडी येथील घोळवे वस्ती व डोईफोडे वस्ती रस्ता करणे 25 लक्ष.
 • अंथर्णे ते इंदापूर बारामती रस्ता ते सावतामाळी रस्ता करणे 20 लक्ष.
 • गलांडवाडी नंबर 2 कोटलिंगनाथ मंदिर परिसर सामाजिक सभागृह बांधकाम 5 लक्ष.
 • कचरवाडी निमगाव येथील भवानी माता सभामंडप बांधकाम 5 लक्ष.
 • निंबोडी येथे भगवान घोळवे वस्ती हायमास्ट दिवे बसवले 2 लक्ष.