राष्ट्रीय कुटूंब लाभ योजनेतून १ लाख ४० हजार रुपये अनुदान मंजूर - तालुकाध्यक्ष सागर मिसाळ

राष्ट्रीय कुटूंब लाभ योजनेतून १ लाख ४० हजार रुपये अनुदान मंजूर - तालुकाध्यक्ष सागर मिसाळ

इंदापूर || राष्ट्रीय कुटूंब लाभ योजनेतून इंदापूर तालुक्यातील सात लाभार्थीना 1 लाख 40 हजार रुपये अनुदान मंजूर झाले असल्याची माहिती संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष सागर मिसाळ यांनी शुक्रवार दि.30 जुलै रोजी दिली. राष्ट्रीय कुंटुंब लाभ योजनेचे माहे जुलै 2021 मध्ये 7 प्रकरणे या योजनेच्या संपुर्ण कागद पत्रासहित कार्यालयांत प्राप्त झाली होती. 7 लाभार्थ्यांना 20 हजार रुपये प्रमाणे चेक मंजूर करण्यात आले असल्याचे सागर मिसाळ यांनी सांगितले. 

यावेळी बोलताना सागर मिसाळ म्हणाले की राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना सर्वसामान्य माणसाला न्याय मिळेल या भावनेतून संजय गांधी निराधार योजनेचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम आम्ही करत आहोत.इंदापूर तालुक्यांतील सन 2019 ते 2021 या 3 वर्षाच्या काळांत सन 2002 ते 2007 च्या द्ररिद्य रेषेखाली कुटूंबांतील प्रमुख व्यक्ती मयत झाल्या असल्यांस त्यांच्या कुटूंबातील सदस्यांनी सर्वकागदपत्रे घेऊन इंदापूर चे नायब तहसिलदार प्रियंका वायकर यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन ही संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष सागर मिसाळ यांनी केले आहे.

या लाभार्थ्यांना मिळाला लाभ … 

श्रीमती.काजल रविंद्र साबळे ( अंथुर्णे ),श्रीमती.कस्तुरा शहाजी चव्हाण (लासुर्णे ),श्रीमती.वैशाली अंकुश ढावरे( इंदापूर ),श्रीमती. अनुराधा रामचंद्र पवार ( कळंब ) कु.हर्षल हनुमंत कोकाटे (सराटी ), श्रीमती द्रोपदा रामचंद्र जाधव (काटी ) व श्रीमती.कांचन रोहिदास कांबळे (रुई )